आयुष्य हे साबणाच्या फुग्यांसारखेच असते क्षणिक ... बनवणारा अनेक फुगे बनवत असतो ... काही मोठे, काही छोटे, काही जास्त चमकणारे, काही बनल्या क्षणीच नष्ट होणारे तर काही अपेक्षे पेक्षा उंच उंच जावून आपले अस्तित्व दाखवणारे ... पण सर्वात साम्य एकच आहे कि सर्व जीवनाच्या आणि वेळेच्या दिशेने एकसर जात असता ... कोणी ही हां नियम तोडू नाही शकत ना तोडतो .... माणसाचे पण असेच आहे जन्माच्या वेळी देश,धर्म,जात,रंग, रूप, श्रीमंती ही आपल्याला निवडता नाही येत ... आपले अस्तित्व काही दिवसांचे का शंभरीचे हे पण ठरवता नाही येत पण बनवणारा एकच आहे आणि त्यानेच ही विविधता बनवली आहे ... तिला हिणवने आणि नाकारणे म्हणजे आपला आयुष्याचा नश्वर प्रवास वाया घालावने .. जो फुगा वारा आणि निसर्गाशी सामावून स्वतः ला झोकुन देतो तोच जास्त उंच जावून ह्या प्रवासाची जास्त मजा घेतो ... प्रवास तर अटळ आहे फक्त करायचा कसा हे आपला दृष्टिकोण ठरवत असते ... जीवन पहायचा दृष्टिकोण हे जिवनातील ज्ञानाहुन मोठा असतो आणि तो विद्वाना कड़े पण असेल ह्याची शास्वती कोणी देऊ नाही शकत कदाचित रस्त्यावर राहणारा पण तो शिकवून जावू शकतो ....
-असाच एकजण
-असाच एकजण
Post a Comment