छत्रपति शिवराय ह्यांच्या वरील काव्य
शिवरायांचे आठवावे रूप | शिवरायांचा आठवावा प्रताप |
शिवरायांचा आठवावा साक्षेप | भुमंडळी ||१||
शिवरायांचे कैसे बोलणे | शिवरायांचे कैसे चालाणे |
शिवरायांची सलगी देणे | कैसी असे ||२||
सकल सुखांचा केला त्याग | म्हाणोनी साधिजे तो योग |
राज्य साधनाची लगबग | कैसी केली ||३||
याहुनी करावे विशेष | तरीच म्हणवावे पुरूष |
या उपरी आता विशेष | काय लिहावे ||४||
शिवरायांसी आठवावे | जीवित तृणवत मानावे |
इहलोकी परलोकी उरावे | किर्तिरुपे ||५||
निश्च्यायाचा महामेरू | बहुत जनांसी आधारू |
अखंड स्थितीचा निर्धारू | श्रीमंत योगी ||६||
●๋•●๋•●๋•●๋•●๋•●๋•●๋•●๋•●๋•●๋•●๋•●๋•●๋•●๋•●๋•
निश्चयाचा महामेरु।बहुतजनासी आधारु।।
अखंड स्थितीचा निर्धारु।श्रीँमत योगी।।
परोपकाराचिया राशी।उदंड घडती जयाशी
तयाचे गुणमहत्वाशी।तुळणा कैशी?
नरपती,हयपती।गजपती,गडपति
पुरंदर आणि शक्ती।पृष्ठभागी।।
येशवंत, कीर्तिवंत।सामर्थ्यवंत,वरदवंत
पुण्यवंत आणि जयवंत।जाणता राजा॥
आचारशील, विचारशील।दानशील, धर्मशील
सर्वज्ञपणे सुशील।सर्वाठायी॥
धीर,उदार, सुंदर। शूर क्रियेसी तत्पर
सावधपणेसी नृपवर।तुच्छ केले॥
तीर्थक्षेत्रे ती मोडीली।ब्राह्मणस्थाने बिघडली
सकळ पृथ्वी आंदोळली।धर्म गेला॥
देवधर्म,गोब्राह्मण।करावयासाठी रक्षण
ह्रदयस्थ झाला नारायण।प्रेरणा केली॥
उदंड पंडित, पुराणिक।कविश्वर,याज्ञिक,वैदिक
धूर्त,तार्किक,सभानायक।तुमचे ठायी॥
या भुमंडळीचे ठायी।धर्म रक्षी ऐसा नाही।
महाराष्ट्र धर्म राहिला काही।तुम्हा करिता॥
●๋•●๋•●๋•●๋•●๋•●๋•●๋•●๋•●๋•●๋•●๋•●๋•●๋•●๋•●๋•
हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्ततम-तेजा,हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा,
हे हिंदु-सौभाग्य-भूतिच्या-साजा,हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
करि हिंदुराष्ट्र हे तूंते। वंदना,करि अंतःकरण तुज अभि-नंदना,
तव चरणिं भक्तिच्या चर्ची चंदना,गूढाशा पुरवी त्या न कथूं शकतों ज्या...
हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा ।हा भग्न तट असे गडागडाचा आजी,
हा भग्न आज जयदु्र्गं आंसवांमाजी,ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा,
ती म्हणुनि भवानी दे न कुणा आधारा...
गड कोट जंजिरे सारे । भंगल,जाहलीं राजधान्यांची । जंगलें,
परदास्य-पराभविं सारीं । मंगलें,या जगतिं जगू हीं आज गमतसें लज्जा...
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा ।
जी शुद्धि हृदाची रामदासशिर डुलवी,जी बुध्दि पांच शाहींस शत्रुच्या झुलवी,
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी,जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी...
ती शुध्दि हेतुचि कर्मी । राहु दे,ती बुध्दि भाबडया जीवां । लाहु दे,
ती शक्ती शोणितामाजी । वाहु दे,दे पुन्हा मंत्र तो दिलें समर्थे तुज ज्या...
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा ।
●๋•●๋•●๋•●๋•●๋•●๋•●๋•●๋•●๋•●๋•●๋•●๋•●๋•●๋•●๋•