Home » » बिहार तेव्हा आणि आत्ता

बिहार तेव्हा आणि आत्ता

Written By Unknown on Saturday, September 8, 2012 | 5:53 PM



ठाकरे कुटुंबीय मगध काळात बिहार मधून महाराष्ट्रात आले असे तो वायफळ बडबड करणारा नेता बोलला आणि झी हिंदी वाल्यांनी लगेच १ तासाचा प्रोग्राम लावला ..
असो ठाकरे परिवार ह्या माणसाचा काय तो व्यक्तिगत समाचार घेतीलच ...
पण मगध !
जरासंधाचे राज्य मगध ..
जिथे श्रीरामांच्या आदेश वरून सुग्रीवाने देवी सीतेला शोधण्यास वानर पाठवले ते मगध ..
तथागत बुद्धांनी धम्म मार्ग प्रस्थपित केला ते मगध ..
बिब्मिसार आणि अजातशत्रू ह्यांच्या पराक्रमाचे साक्षी असलेले मगध ..
भगवान महावीर ह्यांच्या कार्याने प्रफ्फुलीत झालेले मगध ..
नंद काळा मध्ये मगध जगातील सर्वात प्रगत राज्य होते ..
जागतिक शिक्षणाचे केंद्र होते ..
पण आता बिहार ची स्थिती काय आहे? आणि ती कोणी केली ?
अजून पण जगातील मोजक्या पोलिओ प्रभावित राज्यान मध्ये बिहारचा समावेश आहे ..
लालू च्या काळा मध्ये इथला विकास दर इतका कमी होता कि भारताचा त्यामुळे विकासदर २-३ % उतरत असे ..
पूर्ण बिहार मध्ये फक्त ४ चांगले अभियांत्रिकी महाविद्यालये आहे आणि लोकसंख्या १० करोड ..
शिक्षण,वीज,रस्ते अजून गावागावात पोहोचले नाही ..
आफ्रिकेतील देशांचे जेवढे शोषण तिथल्या जग प्रसिद्ध क्रूर हुकुम शहांनी नसेल केले तेवढे शोषण बिहारी जनतेचे लोकशाहीवादी नेत्यांनी केले आहे ..
पहिले हे बदला .. ६५ वर्षे राज्य कोणी केले ?
मागासलेले कोणी नसते .. बस संधी लागते .. ते देणारेच संधी साधू आहे ..
सत्ता बदला देश बदलेले हा संदेश मगध नेच दिला .. पण तेव्हा चाणक्य होते .. आता कोणी नाही !
- असाच एकजण
Share this article :

Post a Comment

 
Support : Asach Ekjan | Faltupna.in
Copyright © 2011. असाच एकजण - All Rights Reserved
Proudly Maintain by Boneless.in