Home » , » मतदान कमी होते .. दोषी कोण ? Why Voting is less in Maharashtra Election?

मतदान कमी होते .. दोषी कोण ? Why Voting is less in Maharashtra Election?

Written By Kaustubh Shukla on Thursday, February 16, 2012 | 5:54 AM

मतदान कमी झाले तर फक्त लोकांना बोलून भागणार नाही ... ह्या वर सर्व राजकीय व्यक्ति,मिडिया ह्यांना विचार करावा लागेल ...
लोकांना बोलून आपला राग व्यक्त करणे आणि त्यांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करून मोकळ होणे चुकीचे आहे ...

- लोकांना मिडियाचा घराणेशाही आणि नेतेशाहीच्या बातम्यांचा कंटाळा आला आहे ...
- राजकीय नेत्यांची पवित्रता, कर्तव्य निष्ठां ह्या गोष्टीं पासून असलेला दुरावा लोकांना मतदान करण्यास प्रेरित करत नाही ...
- लोकशाही चा बाजार मांडल्याने लोकांची निवडणुक प्रक्रिये वरची आस्था कमी होत आहे ...
- बोगस वोटिंग हे नाही मान्य केले तरी होतेच , जे पूर्ण प्रक्रियेवर साशंकता निर्माण होते ...
- कोणी पण नेता एवढा मोठा नाही कि आपले आयुष्य सोडून त्याचा उदोउदो करत लोक फिरतील ...
- जनता ही अत्यंत हुशार असते आणि तिला ग्राह्य धरून आपण स्वतः ला शहाणे समजतो खरे पण वास्तवत: तोंड घशी पडतो ...

जर शहरांच्या तिजोर्या लुटणे असेच चालू ठेवले तर एक दिवस मुंबई,पुणे,ठाणे,नाशिक आणि इतर प्रमुख शहरा मधे पैसे देवून पण मत द्यायला माणुस भेटणार नाही ...
लोकशाही ही एक व्यवस्था आहे आणि तिला मरू न देणे हे जवाबदार लोकांच्या हातात आहे ...
लोकनेते बनत राहता पण त्यांनी तत्त्व नाही धरले तर कापुरासारखे उडून पण जाता ..
खुले आम सुरु असलेला पैश्यांचा पावूस पाहून दोन घास कमावण्यासाठी रक्त जाळनारा सामान्य माणुस नक्कीच विचार करत असेल हे ध्यानात ठेवा ....
Share this article :

Post a Comment

 
Support : Asach Ekjan | Faltupna.in
Copyright © 2011. असाच एकजण - All Rights Reserved
Proudly Maintain by Boneless.in