Home » » माजी राष्ट्रपती A.P.J. अब्दुल कलाम साहेब

माजी राष्ट्रपती A.P.J. अब्दुल कलाम साहेब

Written By Kaustubh Shukla on Saturday, January 21, 2012 | 5:28 AM

एकदा ७० भारतीय वैज्ञानिक एका महत्वपुर्ण अशा प्रकल्पावर काम करत होते , त्यामुळे साहजिकच ते प्रचंड तणावाखाली होती , आणि हा देशहिताचा प्रकल्प असल्यामुळे प्रत्येकजण अतोनात जीव ओतुन प्रामाणिकपणे ह्या प्रकल्पावर काम करत होते.....!!!

एके दिवशी सकाळी त्या प्रकल्पात काम करणारा , एक वैज्ञानिक तेथील बॉस कडे गेला आणि म्हणाला "सर मला आज संध्याकाळी ५.३० वाजताच घरी जायचे आहे , मी माझ्या मुलांना शहरात एक प्रदर्शन दाखविण्याचे वचन दिले आहे" , त्याच्या बॉसने ही गोष्ट मान्य केली , तो वैज्ञानिक अत्यंत मग्नतेने कामावर लागला , आणि जेव्हा त्याचे घड्याळाकडे लक्ष गेले तेव्हा रात्रीचे ८.३० वाजले होते ......

त्यानंतर जेव्हा तो वैज्ञानिक घरी आला तेव्हा त्याच्या मनात खुप विस्फोटक परिस्थिती होती , तो जेव्हा आत गेला तेव्हा त्याच्या पत्नीने न रागावता हसतमुखाने विचारल तुम्हाला कॉफी हवीय का? ही त्याच्यासाठी विरोधात्मक परिस्थिती होती , जेव्हा त्याने मुलांची चौकशी केली तेव्हा त्याला समजले की त्याच्या बॉसने ५.१५ वाजताच मुलांना नेले होते ,.....
कारण जेव्हा तो काम करण्यात मग्न होता तेव्हा त्याच्या बॉसना ५ वाजता वाटले की ह्याला कामाच्या मग्नतेमध्ये वेळेचे भान रहाणार नाही त्यामळे ते स्वत: गेले होते.
आणि ते होते भारताचे लाडके मिसाईल मॅन व माजी राष्ट्रपती A.P.J. अब्दुल कलाम साहेब , त्यांच्या व त्यांच्या सहकार्याँच्या ह्याच कामाच्या समर्पणामुळे व एकमेकांच्या काळजी घेण्याच्या वृत्तीमुळे भारताने थुंभा येथुन अग्नी क्षेपणस्त्राचे यशस्वी प्रक्षेपण करुन दाखविले.....!!!

त्या कलाम साहेबांचा आज वाढदिवस आहे , त्यांना वाढदिवसाच्या शत कोटी हार्दिक शुभेच्छा.....!!!

Source:Facebook
Share this article :

Post a Comment

 
Support : Asach Ekjan | Faltupna.in
Copyright © 2011. असाच एकजण - All Rights Reserved
Proudly Maintain by Boneless.in