साहेब माफ़ करा मी बूट फेकून मारला
तुम्ही देश लुटता त्याचा तो राग धरला
तुम्ही तर प्रामणिक, आपले काम करता
दिवस रात्र एक करून, आपले बैंक खाते भरता
तुमचे ध्येय एकच आणि दिशा पण निश्चित
मते देता तुम्हा भरभरून सर्व अक्षिशित
माझी मती गेली जे मी भ्रष्ट झालो
दिड दमडीच्या नेत्यावर 'वूडलैंड' चा बूट फेकून आलो ...
सर्व हक्क : असाच एकजण
Post a Comment