एक राजपुत्र जेव्हा त्यांचा देश चालवायचा हट्ट करतो तर त्याची आई त्याला असे समजावते ...(काव्य काल्पनिक आहे ...नोंद घ्यावी )
आई आई होणार का मी ? ह्या देशाचा राजा बरे
करून राज्य पुर्वंजा सारखे,आपलेच करणार खरे
होरे बाळा, सोन्या माझा, तूच आहे ह्या देशाचा आधार
तूच करणार राज्य इथे अन करणार जनता निराधार
चिंता नसावी तुला कशाची सजणार सोनेरी मुकुट
लाखो जरी मरे उपाशी तूच घालणार सूट बूट
मेलेले काय तुला डिवचणार? ते शरण तुला नक्की जाणार
विकत घेवुन नम्र सेवक तूच आपले भविष्य घडवणार
हां देश बदलला आणि बदलली संस्कृति देखिल
परकीय लुँटता तरी इथे जनता बेफिकीर
मरता का इथे लाखो भूमिपुत्र काय आहे गरिबिचे रहस्य ?
सर्व विसरतील एक क्षणात पाहून तुझे गालावरील हास्य
तूच फोडणार नारळ आणि तूच हो आता सज्ज
देश ज़री माती झाला तरी त्यातून होणार तुझ्याच पुतळ्यान्चे राज्य
सर्व हक्क - असाच एकजण
Post a Comment