लवकरच आमच्या कड़े महापालिकेचे मतदान आहे ..
एक मित्र आहे त्याला तारखा जाहिर झाल्यावर रस्त्यातुन जात असतांना सांगितले ..
"भाऊ, गरीबाचे नाव पण टाक बर का !!.."
"बस्स .. का राजे तुम्ही आहातच, साहेब कालच विचारत होते " तो हसत बोलला ..
मी मनात "आता बरोबर आठवण आली फुल्या-फुल्याला " म्हणून मोकळा झालो ..
त्याचे कसे आहे प्रचारासाठी ३०० रुपये रोज आहे १० दिवस आणि मतदान असेल तेव्हा २००० वेगळे,
असो आता मार्केट मधे ७० -८० पेटी उतरणार आहे एका उमेदवाराची .. फुल हवा आहे !! बहुतेक या वेळी जास्त मिळतील ..
आमचे नगरसेवक अप्पा साहेब तर त्यांचा २०० वाराचा प्लोट विकत आहे . आणि कसे आहे मी भाषण पण लिहू शकतो म्हणून मला थोडा जास्त मान आहे त्यांच्या नजरेत ...तसेच मला ४ सभ्य लोक पण ओळखता... नाहीतर अप्पांची पोर बापासाठी मत मागता तर हवेत माणिकचंद चे फवारे उड़वत बसता म्हणून त्यांना यावेळी मागे ठेवण्याचा निर्णय आहे ...
तसा आमचा नगरसेवक अप्पा एक नंबर चालू माणुस ... मी त्याला रोज एक तरी शिवी घालतो कारण आमचा रस्ता अजुन पण निट नाही आहे ... बाजूचे काका पण म्हणत असता "अरे तो अप्पा तुला स्कॉर्पियो मधून भेटायला येतो मग सांग कि लेका जरा त्याला रस्ता निट करायला .. " मी पण त्याला नक्की सांगतो म्हणून गेले १० वर्षे त्यांना कटवत आहे ...
असो अप्पा आता मंगल कार्यालय, बियरबार चे मालक झाले आहे .. त्यांची वसूली पण चालते ..
हाच अप्पा रिक्शा चालवायचा आता तो देश चालवतो आहे ... रिक्शा मधले त्याचे मीटर खुप फास्ट पळायचे म्हणे आणि रिक्शा हळू हळू आत्ता पण तसेच आहे आता त्याची प्रगति मीटर सारखी आहे आणि देशाची रिक्शाच्या गति सारखी .. .पण काहीही असो आम्ही रिक्शा वाल्या शेजारी बसून प्रवास करणारे त्याचे कार्यकर्ते आहोत आम्हाला आमचा नेता रस्त्याने जातांना थांबुन विचारपूस करतो ह्याचाच गर्व आमच्या चेहर्यावर..
"तर ये कधी पार्टी करू" असे भाव पण तो व्यक्त करतो माझ्या कड़े ...
पण मनातून "मी एवढे लुटून पण जगुन कसा राहिला आहे!!" हेच विचार असतील कदाचित . मागील विजयानंतर क्रेडिट कार्ड कम्पनिचे इंग्लिश पत्र वाचणे आणि जगातील सर्वात प्रसिद्द वाईन कुठली विचाराणे एवढेच कामासाठी माझी आठवण झाली त्याला ...असो
तर असे आहे सगळ आमचे मत तरी अप्पालाच कारण हाच आमचा नेता आणि आम्ही ह्याचे कार्यकर्ते...
सर्व हक्क -असाच एकजण
Home »
छोटे लेख - Small Article
» हाच आमचा नेता आणि आम्ही ह्याचे कार्यकर्ते ....
हाच आमचा नेता आणि आम्ही ह्याचे कार्यकर्ते ....
Written By Kaustubh Shukla on Monday, January 30, 2012 | 1:02 AM
Labels:
छोटे लेख - Small Article
Post a Comment