गाँधीवध का गाँधीहत्या ?
Written By Kaustubh Shukla on Monday, January 30, 2012 | 12:24 AM
आज महात्मा गाँधी पुण्यतिथि ...
आज समाज गाँधीवध का गाँधीहत्या ह्या दरीत अडकला आहे ...
आपल्या कड़े नथूराम गोडसे पण लोकप्रिय आहे ... कदाचित तेच अधिक लोकप्रिय असतील ...
महात्मा गांधींना बोलणारे आणि टिका करणारे लोक सहज सापडता ....
पण कदाचित आपण आपला वर्तमान हा इतिहासाच्या चर्चेत गरजेहून अधिक घालवतो आहोत ....
इतिहासाकडून भारताने काही शिकले नाही आणि तीच तीच चुक आपण परत करत आहोत ...
अश्या बकाल सामाजिक वर्तमानापासून लक्ष्य दूर नेण्यासाठी इतिहासाच्या गुंत्यात सामन्यांचे पाय अड़कवणे कदाचित नियोजन पूर्वक चालू आहे ...
८० करोड़ गरिबांना, आत्महत्या करणार्या शेतकर्यांना, नोकरी प्राप्त करण्यासाठी लाखो रुपये भरणार्या बेकाराला काही फरक नाही पडत कि नथुराम योग्य होता का महात्माजी ...
इतिहास कोण वाचतो हो आजकाल ... काही मोजका टक्का ... बाकी भारताला तर पोटाचिच काळजी पडलेली ....
इतिहास काय योग्य काय अयोग्य हे ठरवणे गरजेचे आहे आणि असेलही तरी त्याहून मोठी गोष्ट आहे योग्य वर्तमान निर्माण करणे ...
छत्रपति शिवरायांची तरी हीच शिकवण आहे ...
हे सत्य आहे कि हां देश इंग्रजांनी जेवढा नाही लुटला तेवढा आपल्या लोकांनी लुटला आहे .. लुटत आहे ...
बोलायचे एकच आहे कि किती वर्षे अजुन तो इतिहासाचा चहा उकळत बसायचा ?
गीतेत जो कर्मयोग सांगितला आहे तो ध्येय मानून देशाने भविष्य घडवावे ...
कारण भक्षक कोण आणि रक्षक कोण हे पुरावा जरी नसला तरी आपण सर्वास माहित आहे ...
आपण जीवनात ध्येय म्हणून धरलेला विचार जर आपल्या जीवनात आपण नाही उतरवू शकलो तर तो आपला पराभव असतो ...
विचार चुकीचा नसतो .. तत्व चुकीचे नसता ...
शस्त्र हे शत्रु म्हणजे ज्याने आपल्यावर शस्त्र उगारले त्याच्यावर उचलावे अशी धर्माची शिकवण आहे ..
हिंसा मान्य आहे पण त्याला पण मर्यादा आहे कि ती कोणाविरुद्ध आणि कोणासाठी करावी ...
आहिंसा हे तत्व जे हजारो वर्षांपासून सर्व धर्माने जगाला दिले ते फ़क्त गाँधीवादाने स्वीकारले म्हणून त्या तत्वाला खोटे ठरवने देखिल घातक आहे ..
महात्मा गाँधी एक विचार म्हणून नक्कीच मोठे होते .. महात्मा गाँधीना विनम्र अभिवादन
फोटो:महात्मा गाँधी ह्यांची अंतयात्रा
Labels:
इतिहास - History,
छोटे लेख - Small Article
Post a Comment