Home » , » छत्रपति शिवाजी महाराज ... एक तेजस्वी सूर्य

छत्रपति शिवाजी महाराज ... एक तेजस्वी सूर्य

Written By Kaustubh Shukla on Sunday, February 19, 2012 | 12:29 AM



फरक एवढाच आहे ...
"मला जग जिंकायचे आहे " - सिंकंदर- जगातील सर्वात मोठा योद्धा
"मला रयतेला आपले वाटणारे स्वराज्य घडवायचे आहे " - छत्रपति शिवराय - जगातील एकमात्र जनतेचा राजा
----------------------------------------------------------------------------------
काही दिवसांपूर्वी एक प्रदर्शन पाहिले, तिथे माझ्या ओळखिचे एक व्यक्ति मला शिवराय आणि सिंकंदर म्हणजे अलेक्झांडर-द-ग्रेट [अलक्शंद्र{हिंदी मधे }] ह्याची काय तुलना होवू शकते ह्या बद्दल मत विचारत होते. तेव्हा मी त्यांना बोललो कि,
सिकंदर हा समुद्रासारखा ३ खंड जिंकलेला सागर होता तर शिवराय हे कमी भूभाग जिंकलेले गोड्या पाण्याचे तळ होते. सागर हा मोहक असतो, विशाल असतो आणि श्रीमंत असतो पण आपली तहान हे तळच भागवू शकते कारण ते आपल्यासाठीच असते. कुठे जीवनात आपले पावित्र्य जपणारे निश्चयाचे महामेरु शिवराय आणि कुठे शरीर भावात अड़कलेली संस्कृति जपणारा सिकंदर. श्रीमंती म्हणजे काय ह़ो .. सोने नाणे जमवने थोड़ी असते .. ते तर काय निर्जीव धातुचे तुकडे आहे .. श्रीमंती तर विचारांची असते ..शिवरायांशी कोणाची तुलना होवूच नाही शकत.
आणि शिवराय सर्वात श्रीमंत होते ते त्यांच्या मावळ्यांमुळे ..जगाच्या इतिहासात मातृभूमि साठी जीव देणारे सरदार आणि सैन्य ज्ञात आहे पण आपल्या राजासाठी सैन्य काय जनता पण जीव देते हे फक्त शिवशाहितच घडले. सिंकंदर चे तर अर्धे सैन्य जिंकलेल्या राज्यातून घेतले होते जे शेवट युद्धाला आणि आपल्या राजाला वैतागले होते. जग फिरून जग जाणु न शकलेला सिकंदर हां जागे वरून जग जाणनार्या शिवरायांची पत नाही पकडू शकत पण त्याचे शौर्य नक्कीच वन्दनीय आहे आणि त्याला एकदा काय हजारदा सलाम आहे कारण योग्य ती प्रशंसा करणे ही आपली संस्कृति आहे.
महाभारतात धर्मराजाचे राज्य हे जे लोक ऐकून होते त्यांनी ते नक्कीच त्यावेळी शिवरायांमधे पाहिले असेल...
मला माझे अमराठी मित्र नेहमी म्हणता कि महाराष्ट्रात लोक जे 'जय महाराष्ट्र' बोलतात ते आम्ही कुठे आमच्या राज्याबद्दल बोलतो तर माझे त्यांना एकच सांगणे असते कि आमच्या कड़े शिवराय झाले म्हणून आम्ही आमच्या भूमिचा, मराठी मातेचा जयजयकार आम्ही करतो....
शेवट एकच कि शिवरायांना ना कोणी जातित अडकवू शकत ना कुठला राजकारणी प्रतिमेत कारण या जगात सूर्य सर्वांचा आहे .. तो जगाचा आहे ... त्या सुर्याचा विचार घ्यावा कारण त्याला डोक्यावर बसवायला त्याचे तेज सहन करायची पात्रता लागते आणि ती आता कोणात नाही हे नक्की .

-असाच एकजण
 


Share this article :

Post a Comment

 
Support : Asach Ekjan | Faltupna.in
Copyright © 2011. असाच एकजण - All Rights Reserved
Proudly Maintain by Boneless.in