Home » » शिव जयंती - १९ फेब्रुवारी २०१२

शिव जयंती - १९ फेब्रुवारी २०१२

Written By Kaustubh Shukla on Sunday, February 19, 2012 | 5:23 AM

आज बहुतांशी मराठी पेजेस शिव जयंती साजरी करत आहेत .. 
काही समर्थक ..काही विरोधक .. काही अनोळखी ..
हे पाहून छत्रपति शिवराय हे किती प्रखर तत्व होते ह्याची जाणीव होते ...
अजुनही महाराष्ट्राच्या मराठी मनात फ़क्त आणि फ़क्त शिवरायच राज्य करतात ..
ह्या महापुरुशास जात,धर्म आणि भाषा ह्या तराजू मधे तोलणारे येत राहतील आणि जात राहतील पण 
इतिहासातील प्रखर असा राज्यकर्ता जनतेच्या मनात ह्या सर्व भेदा पलिकडे जावून राज्य करतो ...
शिवरायांचे गुरु कोण ,शिक्षक कोण , किती मंत्री ब्राह्मन,मराठा,मुस्लिम अथवा इतर जातीय हे मोजणारे पण आता अनेक जण भेटता ...
पण मराठी मनाला कधी हा भेद पचला नाही आणि मान्य देखिल नाही ...
सर्व तत्वा पलिकडचे तत्त्व जाणलेला , धर्मातील धर्म जाणलेला ... प्रसंगी नम्र,प्रसंगी कठोर ,प्रसंगी माघार पण घेणारा आणि वेळ साधून दुष्टांचा नायनाट करणारा राजा आपणास लाभला हे आपले भाग्य ..
शिव जयंती म्हणजे शिवरायांचा जयजयकार आणि तो रोजच मनात चालू असतो त्यात तारीख वा तिथि हां भेद नाही ..
शिवराय हे फ़क्त एक प्रखर विचार आहे आणि तो जीवनात उतरावा हीच प्रभु चरणी प्रार्थना ...
|| जय भवानी जय शिवाजी ||

असाच एकजण
Share this article :

Post a Comment

 
Support : Asach Ekjan | Faltupna.in
Copyright © 2011. असाच एकजण - All Rights Reserved
Proudly Maintain by Boneless.in