Home » , » कवी कुसुमाग्रज जयंती - मराठी भाषा दिन

कवी कुसुमाग्रज जयंती - मराठी भाषा दिन

Written By Kaustubh Shukla on Monday, February 27, 2012 | 12:30 AM

आज मराठी भाषा दिन ...
आपल्या आमोद आणि प्रमोदत अंतर्मुख होवून विचार करण्याची वेळ आली आहे कि मराठी भाषेची नक्की स्थिति काय आहे .. अनेक भाषेंचे आक्रमण आणि बहुढंगी सामाजिक वास्तवात जगणारा मराठी माणुस हा मराठी भाषेबद्दल नक्कीच जागृत आहे हे नक्की ... कोणी उहापोह करेल कि आता मराठी माध्यमात कोण शिकतो आणि मुंबई सारख्या शहरात मराठी कोण बोलतो पण कट्टरता हा महाराष्ट्राचा गुण धर्म कधीच नव्हता आणि महाराष्ट्र म्हणूनच पुरोगामी आहे ... भले आज संत साहित्य आकलन करू शकणारे विरळ होऊ घातले आहेत पण शालिवाहन युगीन माय मराठीची गोडी असणारे अजुनही अनेक रसिक हा देश पेलतो ... संस्कृतचा अलंकारिक अपभ्रंश असणारी आपली २००० वर्षे जुनी भाषा ही नक्कीच इतरांना हेवा वाटावी अशी आहे .. शुद्ध मराठी ते बोली भाषेतील मराठी ह्या प्रवासात पण मराठी भाषेने आपला आत्मा जिवंत ठेवला आहे ... मराठी भाषेमधे सांस्कृतिकपणा आहे म्हणून बहुतांशी मराठी माणुस हा सांस्कृतिकपणाची जाण असणारा आहे हे तुम्हाला इतर राज्यात गेल्यावर समजुन येइल ... आपल्या इतिहासा बद्दल जेवढा अभिमान हा मराठी माणसाला आहे तेवढा कदाचित इतर राज्यांना असेल ... जय महाराष्ट्र ! हे स्फूर्तिवचन हे इतर कुठले पण राज्य त्यांच्या राज्यबद्दल वापरत नाही आणि ह्या घोषने मधे फक्त प्रमाणिक मराठी प्रेम आहे ... मुग़ल असो नाहीतर ब्रिटिश यांविरुद्ध मराठी रक्त लढ़ण्यात नेहमी अग्रेस्सर राहिले आहे ... ह्या भाषेने जागतिक विचारवंत दिले आहे ... जगाला राजधर्म शिकवणारे शिवराय रूपी राजे दिले आहेत ... ह्या भाषेच्या भविष्याची चिंता तरी नक्की कोणी करू नये ...आपण पाहतो कि अनेकांना सदैव इंग्लिश मधे अथवा हिंदी मधे बोलण्याच्या मोह असतो .. कारण त्यांना मराठीची महती समजली नाही ते त्यांचेच दुर्दैव ... त्यांनी कदाचित कधी ज्ञानेश्वरी,तुकारामांची गाथा,दासबोध ते नवसाहित्य चाखले नाही असे आपण समजू शकतो ... तसे तुकोबारायांनी देखिल हिंदी काव्य रचली आणि भाषा भेद हा तोडला व दोन भाषांची तुलना कधी होत नाही करू पण नये ... तदापि अमृताशी पण पैजा कोणी जिंकेल तर ती आपली माय मराठीच ..

-असाच एकजण

छायाचित्र : कुसुमाग्रज २७/०२/१९१२ - १०/०३/१९९९
Share this article :

Post a Comment

 
Support : Asach Ekjan | Faltupna.in
Copyright © 2011. असाच एकजण - All Rights Reserved
Proudly Maintain by Boneless.in