गणपतराव नलावडे पुणे शहराचे 'मेयर' झाले.
.
ही वार्ता कळल्यावर ....दोन .....दिवसांनी सावरकरांकडून अभिनंदनाचे पत्र त्यांच्याकडे आले.
त्यांत म्हटले होते, 'पत्र पाठवण्यास विलंब होत आहे. त्याबद्दल क्षमस्व, 'मेयर' या शब्दाला प्रतिशब्द काय असावा याचा विचार करत होतो.
तो शब्द मिळाला. 'महापौर हा शब्द अधिक योग्य वाटतो.'
.
पत्र मिळताच गणपतराव आपल्या कार्यालाय्बाहेर धावले. त्यांनी शिपायाला 'मेयर ऑफ पुणे' ची पाटी काढायला लावली. लगोलग 'महापौर' ची पाटी तयार झाली. तेव्हापासून हा शब्द रोजच्या व्यवहारात सहज रुळला.
सावरकरांनी रूढ केलेले कितीतरी शब्द आपण वापरत असतो, ते आपल्याला माहीतही नसतं. सुरुवातीला जेव्हा ते आले, तेव्हा ते कसे काय रूढ होणार, म्हणून त्यांची चेष्टा झाली.
.'
रिपोर्टर'चं भाषांतर करताना त्यांनी 'वार्ताहर' असं केलं.वार्तांचं, म्हणजे बातम्यांचं हरण करणारा, खेचून नेणारा, तो वार्ताहर...... इथे प्रतिभासंपन्न कवीची छाप दिसते.
.
मेयर' याच्यापेक्षा 'महापौर' याचा अर्थ लोकांना जास्त कळतो
.
संपादक आणि वृत्तपत्रातले बाकीचे पदाधिकारी , त्यांची पदं हे सगळे आजचे रूढ शब्द सावरकरांनीच दिलेत.
.
चित्रपट सृष्टीतल्या लोकांचे दिग्दर्शक, संकलक हे शब्द त्यांनी दिले
.
आमदार, नामदार, खासदार हे शब्द त्यांचेच
Source : Facebook
Source : Facebook
Post a Comment